अशा प्रकारे ऑफलाइन मोडमध्ये देखील वापरु शकता Google Maps

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला फक्त Google Maps पुरेसे आहे. पण ते वापरण्यासाठी आपल्या फोनमध्ये इंटरनेट असणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा नेट पॅक संपल्यामुळे किंवा नेटवर्कच्या समस्येमुळे आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध नसते. मग Google Maps कसे वापरणार? आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत.

तुम्हाला कोणतेही ठिकाण किंवा क्षेत्र सेव्ह करण्याची सुविधा गुगल मॅपवर दिली जाते. पण, तुम्हाला हे फोनमध्ये इंटरनेट चालू असतानाच काम हाताळावे लागेल. नंतर तुम्ही हा सेव्ह केलेला डेटा ऑफलाइन मोडमध्ये वापरू शकता. Android आणि iOS दोन्ही स्मार्टफोनवर ही पद्धत काम करते.

ऑफलाइन मोडमध्ये कसे वापराल Google Maps?

सर्व प्रथम तुमच्या मोबाईलवरील Google Maps अॅप उघडा.
त्यानंतर गुगल मॅप्सच्या वरच्या डावीकडे तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा आणि ‘ऑफलाइन मॅप’ निवडा.
पुढे ‘स्वतःचा नकाशा निवडा’ वर क्लिक करा आणि तुम्हांला जिथे जायचे आहे, ते ठिकाण निवडा.
यानंतर मॅप डाउनलोड केला होईल आणि तुम्ही तो ऑफलाइन देखील वापरु करू शकता.
Google Maps इंटरनेटशिवाय वापरण्यासाठी, आपल्या स्मार्टफोनमध्ये नकाशा (Maps) सेव्ह करणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा कधी फोनला वाय-फायशी कनेक्ट कराल, तेव्हा डाउनलोड केलेले नकाशे आपोआप अपडेट होतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *