Sanjay Raut Press Conference: IT, ED ला हाताशी धरून हा सरकार पाडण्याचा डाव – राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । केंद्रीय एजन्सीजना हाताशी धरून महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केलेलं नाही. एक जबाबदार खासदार काही सांगत आहे, माहिती देत आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं असं आपल्या सेंट्रल एजन्सीजना वाटत नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमक्या कुठल्या विषयावर गौप्यस्फोट करतात याची उत्सुकता होती. पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांनी एक ट्वीट करून निशाणा साधला होता. महाराष्ट्राचा भाजपचा बडा नेता मोठ्या घोटाळ्यात अडकला आहे. मुंबईतल्या ट्रायडंट ग्रूपचं नाव घेत राऊत म्हणाले, मी यासंदर्भात आधी मी पंतप्रधानांना लिस्ट देणार आहे आणि मग तुम्हाला येऊन सांगणार आहे.शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमक्या कुठल्या विषयावर गौप्यस्फोट करतात याची उत्सुकता होती. पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांनी एक ट्वीट करून निशाणा साधला होता.

तुम्हे हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा, हमे बदनाम करते फिर रहे हो अपनी महफिल मे…. अगर हम सच बताने उतर आये तो क्या होगा, असं राऊत यांनी लिहिलं होतं.मार्चमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार, असं पूर्वीही राऊत यांनी सांगितलं होतं. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक मंत्री आणि नेत्यांच्या घरावर IT आयकर विभाग तसंच ED चं छापेसत्र सुरू असताना राऊत यांची पत्रकार परिषद झाली.

किरीट सोमय्यांना अटक करू असं म्हणत राऊत यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. ED चा ससेमिरा मागे लावण्याच्या धमक्या देऊ नका, तुमच्याही नाड्या आमच्या हाती आहेत, असं त्या वेळी ते म्हणाले होते.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर 16 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्हटलं, “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *