महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ वादात सापडला आहे. कपिल शर्मावर बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या आरोपांनंतर वाद निर्माण झाला असून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. हा वाद इतका वाढला आहे की, नेटिझन्स कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. सध्या#BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिगला आहे.
I don’t get to decide who should be invited on @KapilSharmaK9 show. It’s his and his producers choice whom he wants to invite. As far as Bollywood is concerned, I’d say what once Mr. Bachchan was quoted saying about Gandhis: वो राजा हैं हम रंक… https://t.co/la8y9FhB6l
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 7, 2022
विवेक अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार, कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमात ‘द काश्मीर फाईल्स’ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. कोणताही मोठा स्टार आपल्या चित्रपटात अभिनेता नसल्यामुळे कपिल शर्माने कार्यक्रमात प्रमोशन कऱण्याची विनंती फेटाळली असा विवेक अग्निहोत्रींचा आरोप आहे.
कपिल शर्मा शो विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या आरोपांनंतर ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये आहेत. नेटकरी चॅनेल आणि कपिल शर्माच्या निर्मात्यांवर टीका करत असून प्रमोशन करण्यास नकार दिल्यामुळे संताप व्यक्त करत आहेत. कपिल शर्मा शो वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही वेगवेगळ्या कारणांमुळे हा कार्यक्रम वादाला कारणीभूत ठरला आहे.