महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगेळे आरोप केले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते फडणवीस यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारकडून गिरीष महाजन यांनी फसवण्याचा कट सुरू असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. वळसे पाटील म्हणाले की, “माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती मला केली आहे. त्यामुळे मी उद्या सभागृहात उत्तर देईन. “दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा.” असे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर आज विधानसभेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देणार होते. मंगळवारी सभागृहात फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी तयार होतो. मात्र फडणवीस यांनी यावर उद्या (गुरुवारी) बोला अशी मागणी केली. त्यामुळे मी उद्या उत्तर देऊन दूध का दूध अन् पानी का पानी करणार असल्याचे म्हटले आहे. पुढे पाटील म्हणाले की, फडणवीसांनी खरेतर कायदा सुवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले आहेत. अशी टीका देखील यावेळी वळसे पाटील यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह एसीपी सुष्मा चव्हाण आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते. सुष्मा चव्हाण यांनी सर्व कागदपत्रे गृहमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे.