भारतात आणखी एक दानशूर सरकारच्या मदतीला; ११२५ कोटीचे दान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;मुंबई: कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत देशातील अनेक दानशूर पुढे येऊन सरकारला मदत करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. यानंतर भारतीय उद्योगविश्वातील आणखी एक प्रतिष्ठित दानशूर सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर ११२५ कोटीची मदत करण्याचे ठरवले आहे. यापैकी विप्रो लिमिटेड १०० कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपये देऊ करणार आहे. या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे अझीम प्रेमजी फाऊंडेशनने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *