महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई ; भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे. कोरोनाव्हायरसमुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान निजामुद्दीन परिषदेनंतर हा आकडा आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.देशातील कोरोनाव्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 240 रुग्ण रुग्ण आढळलेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील कॅन्सर रुग्णालायतील डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे . या डॉक्टरला व्हायरसची लागण कुठून आणि कशी झाली हे अद्याप समजलेलं नाही. त्यानंतर संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आलं आहे, त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाते आहे.
निजामुद्दीन तब्लिगी परिषदेने देश हादरला
देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) खळबळ माजली आहे. या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. 2000हून अधिक लोकं या परिषदेला हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.