दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘हे’ नियम पाळावेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी (students) परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा होतील. कोरोनाच्या (corona) काळात मागच्या दोन वर्षात मुलांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्याचं ठरवलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या परीक्षा केंद्रावर एक तासापुर्वीच पोहचणं गरजेचं आहे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्राच्या आतमध्ये प्रवेश मिळेल.

या नियमांचे पालन करावे

विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या आगोदर किमान 1 तास आगोदर जावं लागेल.

विद्यार्थ्यांना फेस मास्कसोबत ठेवणे अनिवार्य आहे, त्याचसोबत त्यांच्याकडे सॅनिटायझर ठेवणे गरजेचं आहे.

परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांची तापमान तपासणी केली जाईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाही.

विद्यार्थ्यांच्या हातात पेपर आल्यानंतर त्यांनी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नीट वाचून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *