महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ मार्च । मल्टी कमाॅडिटी बाजारात (एमसीएक्स) सोनं ७०० रुपयांनी स्वस्त झाले. चांदीमध्ये ११०० रुपयांची घसरण झाली. सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. या घसरणीने सोनं ३००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५१७५८ रुपये असून त्यात ५४६ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी आजच्या सत्रात सोन्याचा भाव ५१५४९ रुपयांपर्यंत खाली आला होता. चांदीमध्ये आज ८९४ रुपयांची घट झाली असून एक किलो चांदीचा भाव ६७९५० रुपये इतका आहे.रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव ५५५५८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दोन आठवड्यात सोन्याचा भाव तब्बल ७००० रुपयांनी वाढला. मात्र त्यानंतर त्यात विक्रीचा सपाटा सुरु झाला आणि नफावसुली दिसून आली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५०० रुपये इतका आहे. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५१९३० रुपये इतका आहे. त्यात सोमवारच्या तुलनेत ५४० रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१९३० रुपये इतका आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८१९० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२५७० रुपये झाला आहे. त्यात ५५० रुपयांची घसरण झाली आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१९३३० रुपये इतका आहे.