महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईची चिंता वाढवणारी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील ५ हजार जणांना कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. हे सर्व जण करोनाबाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात आले होते. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६२ करोनाबाधित झाले आहेत. सुदैवाने या संपर्कात आलेल्या सर्वांना कॉरेंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे ते बाहेर फिरुन संसर्ग वाढण्याचा धोका टाळता येणार आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत सध्या एकूण १६२ करोनाबाधित आहेत. राज्यातील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे.’
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला आज भेट दिली. कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. ही यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak#मीचमाझारक्षक#मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/owRmxrTE4z
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2020
राज्यात आता संशयितांची चाचणी वेगाने करण्याचं आव्हान रुग्णालयांसमोर आहे. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये चाचणी केली जात आहे. एका दिवसाला दोन हजार चाचण्या केल्या जाण्याची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.