करोनाग्रस्तांसाठी इंदोरीकरांकडून एक लाखाची मदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;पुणे : पुत्रप्राप्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेले निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांनीही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. इंदोरीकर महाराज यांनी करोनाग्रस्तांवरील उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.

इंदोरीकर महाराज यांनी आज दुपारी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला. संगमनेर तालुका सहाय्यता करोना निधीसाठी हा धनादेश देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतल्या महापुराच्या वेळीही इंदोरीकर महाराजांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संगमनेर येथील सभेत मदतीचा चेक सुपूर्द केला होता. त्यानंतर त्यांनी आजही मदतीचा धनादेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *