खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले ; किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार चा प्रयत्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । होळीच्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमतींनी किचनचं बजेट कोलमडलं आहे. खाद्य तेलाच्या किंमतींबाबत सरकार देखील आता पाऊले उचलणार आहे. केंद्र सरकारने तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी अनेक राज्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. सरकारने तेल उत्पादक, निर्यातदारांसोबतही चर्चा केली आहे.

केंद्राने राज्यांना अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच किमतीत कृत्रिम वाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. साठेबाजी आणि किमतीत वाढ करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि जिल्हा स्तरावर पाळत ठेवण्याचे निर्देश त्यांनी राज्यांना दिले.

गेल्या आठवडाभरात रिफाइंडच्या दरात प्रतिलिटर 25 रुपये आणि बदामाच्या किमतीत 20 ते 30 रुपये किलोने वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती येत्या काही दिवसांत नवा उच्चांक गाठू शकतात.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या पुरवठ्याला तिहेरी धक्का बसला आहे. युक्रेनमधून सूर्यफुलाच्या पुरवठ्यावर दबाव आल्याने इंडोनेशियातील निर्यात धोरणावर आणखी परिणाम झाला आहे. त्यामुळे पामतेल आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय, यामुळे दक्षिण अमेरिकेतील पिकांच्या नुकसानीची चिंता वाढली आहे, ज्यामुळे सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

अवघ्या महिनाभरात (खाद्य तेलाचे) भाव 125 रुपयांवरून 170-180 रुपयांवर पोहोचले आहेत. मे किंवा जूनमध्ये यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. किमतीत आणखी वाढ होण्याचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असेल. पण ती थोडीशी वाढ नक्कीच होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *