महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यासंदर्भात दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने दरेकर यांना दिलासा दिला. त्यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. आता, प्रविण दरेकर यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
सरकारी वकिलांनी दरेकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. याआधी दरेकर यांनी दाखल गुन्ह्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने दरेकर यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार होता होता. तसेच न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिली होती. दरेकर यांची मालमत्ता २ कोटी ९ लाख असून ९० लाख इतकी संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे. त्याचा आधार घेत तसेच आपल्याला विधान परिषद सदस्य म्हणून मिळणारे अडीच लाखाचे मानधन पाहता आपण, मजूर म्हणून तुम्ही पात्र नाहीत, असा सहकार विभागाचा दावा आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता.१७) दिलासा दिला. दरेकर यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दरेकर यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याची मुभा दिल्यावर दरेकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
२५ मार्च पर्यंत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. दरम्यान, अधिवशनकाळात दरेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.