युरोपीय नेत्यांची मागणी ; युद्ध सुरू असतानाच Ukraineच्या राष्ट्रपतींना मिळू शकतं शांततेचं Nobel Prize ,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांना 2022 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळू शकतो. यासाठी युरोपातील अनेक नेत्यांनी नोबेल पुरस्कार समितीकडे नामांकन प्रक्रिया 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत 2022 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी 251 व्यक्ती आणि 92 संस्थांनी अर्ज केले आहेत.

युरोपीय नेत्यांनी नोबेल समितीला 31 मार्च 2022 पर्यंत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युक्रेनच्या लोकांसाठी नोबेल शांतता पुरस्कार नामांकन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे.

युरोपियन नेत्यांनी समितीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी 2022 ची नामांकन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि नामांकनांवर पुनर्विचार करण्याविषयी विनंती केली आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान जाहीर होणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला 22 दिवस झाले आहेत. रशियन फौजा आता युक्रेनच्या पश्चिमेकडील प्रदेशांवर हल्ले करत आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही ठोस निकाल समोर आलेला नाही. त्यामुळं युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये निर्वासितांचा ओघ वाढला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) शुक्रवारी तातडीची बैठक झाली. बैठकीत युक्रेन, अमेरिका आणि ब्रिटनच्या प्रतिनिधींनी रशियावर युक्रेनमधील लोकसंख्या असलेल्या भागांना आणि वैद्यकीय सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप केला, त्यानंतर ही बैठक स्थगित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *