महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ मार्च । रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकीत कंपनी हिरानंदानी समुहावर (Hiranandani Groups) आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. आज सकाळीच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. (it raids on Hiranandani Groups)
हिरानंदानी समुहाच्या २४ जागांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यात मुंबई, चेन्नई, बेंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे. आयकर विभागाचे एक पथक कार्यालयात व अधिकाऱ्यांच्या घरी कागदपत्राची तपासणी करत आहे. आज सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी हिरानंदानी समुहाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.
Maharashtra | Raids underway at several locations of Hiranandani Groups in Mumbai and other cities: Income Tax Department
— ANI (@ANI) March 22, 2022
चेन्नईतील नवी टाऊनशीप आणि बेंगळुरूमधील नवीन डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, ही कारवाई कितीवेळ चालेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.