महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । Tata Motors Price Hike: ऑटोमोबाईल कंपन्या पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. टाटा समूहाची वाहन कंपनी टाटा मोटर्सनेही वाहनांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. टाटा मोटर्सची ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
टाटा मोटर्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कंपनीने उत्पादनांच्या किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक वाहनांमध्ये (CV) 2 ते 2.5 टक्के वाढ होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत इतर ऑटोमोबाईल कंपन्याही किमती वाढवू शकतात.
टाटा मोटर्सने या आधी वाढवल्या किंमती
यापूर्वी टाटा मोटर्सने 1 जानेवारीपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने कंपनीने त्यावेळीही दर वाढवले होते. याशिवाय जानेवारी 2022 मध्ये मारुती, ऑडी, मर्सिडीजसह इतर कंपन्यांनीही किमती वाढवल्या.