महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ मार्च । कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. ब्रिटनमधील नॉर्थ वेल्स येथील एका व्यक्तीला असाच काहीसा अनुभव आला आहे. या व्यक्तीला एका शेतात एक अनोखा दगड सापडला आणि हा शेतकरी रातोरात कोट्याधीश झाला.
द सनच्या वृत्तानुसार, टोनी व्हिल्डिमगल व्रक्सहॅम असे या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी टोनी रात्रीच्या वेळी त्याच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला बसून सिगारेट पीत होता. त्याचवेळी त्याचे लक्ष आभाळाकडे गेले, तिथे काहीतरी विचीत्र चमकताना दिसले. त्यानंतर काही वेळाने त्याने पुन्हा आभाळात पाहिले तर आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी उडालं आणि चेंडूसारखा आगीचा गोळा शेताच्या दिशेने पडला आणि त्यानंतर तो गोळा विझला. त्यावेळी तिथे फक्त धूर दिसत होता.
शेतात नेमकं काय पडले याचा शोध घ्यायला निघाला. त्या गोष्टीला अठरा महिने लोटले. त्याचा शोध सुरुच होता अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. अठरा महिन्यांच्या शोधानंतर एका शेतकऱ्याच्या शेतात त्याला अनोखा दगड मिळाला. टोनीला हा दगड फार अनोखा असल्याचे लक्षात आले होते त्यानंतर टोनीने या दगडाचा तपास घ्यायला सुरुवात केलीय. त्यानंतर जी माहिती समोर आली त्याने त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो दगड साधारण दगड नसून तो उल्कापिंडाचा 2 एलबी 4 ऑउंस एवढा तुकडा होता. त्याची साधारण किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे.