महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ मार्च । उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी मार्च महिन्यातच पारा चाळीच्या पार गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे वीजेची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत आता देशभरातील नागरिकांना बत्ती गुलचा (power outage) सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. (People may face power outage for 2 days in India)
केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी (employees associations) येत्या 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये वीज कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. वीज कर्मचारी जर दोन दिवस संपावर गेले तर देशभरात त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर वीज गेली तर नागरिकांना दोन दिवस वीजेशिवाय काढावे लागण्याची शक्यता आहे. (Trade unions call nationwide strike on 28 and 29 march)
केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील वीज कर्मचारी सहभागी होणार आहेत. देशभरातील विविध ठिकाणी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी वीज कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
केंद्राच्या धोरणांच्या विरोधात देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संप पुकारण्यात येणार आहे. या संदर्भात बुधवारी कामगार संघटनांची बैठक दिल्लीत पार पडली. या संपात बँका, विमा, वीज कर्मचारी संघटना, यासह कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार क्षेत्र, टपाल, आयकर, विमा या क्षेत्रांच्या कर्मचारी संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारच्या धोरणांवर नाराज
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर केंद्राने कथितपणे विविध धोरणे राबवण्यास सुरुवात केल्याचा आरोप कर्मचारी संघटना करत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. हा व्याज दर 8.5 टक्क्यांहून 8.1 टक्के इतका करण्यात आला आहे.
तसेच पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजीच्या दरात अचानक वाढ करण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वांच्या विरोधात देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी 29 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तसेच आज म्हणजेच 24 मार्च रोजी फेसबूकच्या माध्यमातून कामगार संघटनांनी एका सभेचं आयोजन केलं आहे.
या संघटनांनी गेतला बैठकीत सहभाग
दिल्लीत झालेल्या बैठकीत विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन कॉर्डिनेशन सेंटर, सेल्फ एम्प्लॉयड वूमेन्स असोसिएशन, ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, लेबर प्रोग्रेसिव फेडरेशन आणि युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनांनी सहभाग घेतला.