पीएम किसान योजना ; एप्रिलमध्ये येणार ११ व्या हप्त्याची रक्कम ? जाणून घ्या अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ मार्च । पीएम किसान योजनेअंतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या निधीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. डिसेंबर महिन्यात १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. एप्रिलमध्ये ११ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना केवायसी अपडेट करावे लागेल.

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये अनुदान दिले जाते. ही रक्कम तीन हप्त्यात प्रत्येकी २००० रुपयांप्रमाणे दिली जाते. २०१८ मध्ये पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधी ही योजना सुरु केली होती. आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ झाला आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात या योजनेच्या १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी (eKYC) केले नसेल किंवा ई-केवायई (eKYE)केले नसेल, तर शेतकऱ्यांना मिळणारा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. ईकेवायसी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये अलिकडेच सुधारणार करण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आधीच्या कॉर्नर पर्यायाला भेट देऊन किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया ऑनलाइन करू शकता.

अशा प्रकारे ऑनलाइन करा ईकेवायसी –
– सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
– त्यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरवर जा.
– येथे तुम्हाला ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल.
– त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटोपी (OTP) टाका.
– जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहलेले दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *