पंजाबकडून मैदानात उतरलेला हा नवखा क्रिकेटर ठरला हिरो; कोण आहे वैभव अरोर ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ एप्रिल । मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 15 व्या सीझनमधील अकरावा सामना खेळवण्यात आला. झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 54 रननं मोठा पराभव झाला. पंजाब किंग्जनं (Punjab Kings) दिलेलं 181 रनचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. या मॅचमध्ये विशेष म्हणजे पंजाबकडून मैदानात उतरलेला वैभव अरोरा (Vaibhav Arora) याने महेंद्र सिंह धोनीचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा मोईन अलीची विकेट घेतली होती. सध्या क्रिकेट जगतात अरोराची चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.

चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये . पंजाब किंग्सने संघात दोन बदल करत वैभव अरोर आणि जितेशला डेब्युची संधी दिली. वैभव अरोरा (Vaibhav Arora) पंजाब किंग्सचा नेट बॉलर होता. आज त्याच संघातून त्याला खेळण्याची संधी मिळाली. हे त्याच्यासाठी स्वप्न साकार होण्यासारखं आहे.

तर कोण आहे वैभव अरोर?

14 डिसेंबर 1997 रोजी वैभवचा जन्म झाला. वैभव अरोरा अंबालाचा आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तो चंदीगडला आला. त्याने क्रिकेटसाठी हिमाचल प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला.

हिमाचलच्या संघाकडून त्याने रणजी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2017 मध्ये त्याला एक दुखापत झाली होती. त्यामुळे वर्षभर तो क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने जबरदस्त कमबॅक केलं. 2019-20 मध्ये त्याने हिमाचल प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2021 मध्ये सैयद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तो आपला पहिला सामना खेळला. तिथे त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे अनेक फ्रेंचायजींची नजर त्याच्याकडे वळली. सहा सामन्यात 10 विकेट घेऊन त्याने आपल्या टीमला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले.

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सने वैभवला मागच्या सीजनआधी ट्रायलसाठी बोलावलं होतं. त्यानंतर केकेआरने त्याला 20 लाख रुपयात विकत घेतलं. पण संपूर्ण सीजनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. या सीजनमध्ये वैभव अरोराला विकत घेण्यासाठी केकेआर आणि PBKS मध्ये चुरस दिसली. त्यामुळे अवघी 20 लाख बेस प्राइस असलेल्या वैभव अरोराला पंजाबने दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

सर्वप्रथम नेट बॉलर म्हणून तो पंजाब किंग्ससोबत यूएईमध्ये गेला होता. तिथे त्याला ख्रिस गेल, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सारख्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. हेड कोच अनिल कुंबळे त्याचे स्विंग यॉर्कर आणि बाऊन्सरने प्रभावित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *