Pimpri Chinchwad crime : ब्रॅण्डेड कंपनीचे बनावट लेबल लावून जीन्सची विक्री, पिंपरीतून एकाला अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ एप्रिल । ब्रॅण्डेड (Branded) कंपनीचे बनावट (Fake) लेबल लावून बनावट जीन्सची (Jeans) विक्री केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका दुकानदाराला अटक केली आहे. सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, आरोपी इस्माईल इस्तेखार खान (26, रा. मोरवाडी) हा पिंपरी येथे कपड्यांचे दुकान चालवतो आणि त्याने एका ब्रॅण्डेड कंपनीच्या नावाच्या 512 डुप्लिकेट जीन्स विक्रीसाठी ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. महेंद्र सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कॉपीराइट कायदा, 1957च्या संबंधित कलमांतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. याप्रकरणी उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे तपास करत आहेत. तरुणांना विविध ब्रॅण्ड्सचे आकर्षण असते. त्यासाठी ते किंमतही मोजायला तयार असतात. ब्रॅण्डेड जीन्स महाग असतात कारण त्या टिकाऊही असतात. मात्र हा आरोपी कमी प्रतीच्या जीन्सला बनावट लेबल लावत होता.

कॉपीराइट कायद्याची कलमे
आपला ग्राहकवर्ग लक्षात घेऊन कमी प्रतीच्या जीन्सना बनावट लेबल लावून त्याची विक्री करण्यात येत होती. यासंबंधी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी इस्माईल इस्तेखार खान याच्याविरोधात पोलिसांनी कॉपीराइट कायद्याची कलमे लावली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *