महागाईचा बकासूर ; आता सीएनजीची शंभरीकडे वाटचाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ एप्रिल । Petrol Diesel Price Today : इंधन दरवाढ आठवडाभर सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवारी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह आता सीएनजीचे दर वाढले आहेत. पेट्रोल डिझेल आजही 80 पैशांनी महागले आहे.16 दिवसांत 10 रूपयांनी वाढ तर मुंबईत सीएनजी 7 रूपयांनी महागला आहे. (CNG Price Today)

आठवड्याभरातच पुण्यात सीएनजीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजपासून सीएनजीत 5 रुपये 80 पैशाची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशिष्ट गॅसची किम्मत दुप्पट झाल्याने मोठा परिणाम दिसून येत आहे. 1 एप्रिलपासून राज्य सरकारने सीएनजी 6 रुपयांनी कमी केला होता. मात्र आठवड्यातच सीएनजी दर जैसे थेच आहेत. सीएनजी वाहनधारकांना आजपासून 68 रुपयांनी सीएनजी गॅस मिळणार आहे.

राजधानी नवी दिल्लीत इंधनाचे दर प्रत्येकी 40 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी 103.81 रुपये आणि 95.07 रुपये मोजावे लागत आहे. (petrol disel price today) नवी दिल्लीमध्ये 22 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत चौदा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. 21 मार्चला पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९५.४५ रुपये होता. मात्र, 14 दिवसांच्या कालावधीत सुमारे 8 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच, डिझेलच्या दरातही 7 रुपये वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *