महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । ‘मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही श्रीराम आमच्या मनात आहे ‘प्राण जाये पर वचन न जाय’ असं आमचं हिंदुत्व आहे. मुळात संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही’ असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपले काका असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्या पक्षावर घणाघाती टीका केली.
‘विरोधक आणि आमच्यात हाच फरक आहे आम्ही काम करतोय ते दिसतंय. संपलेल्या पक्षांवर वक्तव्य करत नाही. ‘रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन ना जाये’ जनतेला दिलेली वचने आम्ही पूर्ण करत आहोत. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ठाकरे यांनी मनसेवर टीका केली.’शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. राज्याच्या राजकारणात असा प्रकार कधी घडला नाही. असं राजकारण खालच्या पातळीवर कधीच झालं नव्हतं भडकाऊ भाषणं होऊ नये’, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
‘डिलाईल पुलाच्या कामाला उशीर हा दुर्दैवी आहे. डिलाईल चे नाव दिले पुल नाव पडेल अशी स्थिती आहे. मार्च महिन्यात काम पूर्ण होईल असं सांगितलं. परंतु रेल्वेमुळे काम खोळंबले. रेल्वेने याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे गर्डर टाकलं जातं नाही’, अशी टीकाही आदित्य ठाकरे म्हणाले.
‘हिंदमाता ची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. पंप टाक्यांची क्षमता वाढवली आहे गुडघाभर पाणी भरणार नाही. 31 मे पर्यंत पहिल्या टाकीचं काम पूर्ण होईल. हिंदमाताच्या सेंट झेव्हियर्स मैदानात पाणी साठवून राहील 2.87 लिटर क्षमता इथे आहे तसंच प्रमोद महाजन उद्यानातही रेन वॉटर हार्वेस्टिंग करून टाक्या उभ्या करत आहोत काम सुरू आहे. सखोल परिसरात अभ्यास करत आहोत एखादं मैदान असेल तर तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करत आहोत’, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.