Heat wave sustained : राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे. त्यामुळे थोडासा येथे दिलासा मिळाला आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. (Rains in western Maharashtra including Konkan)

महाराष्ट्रात तापमान वाढ आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तरेकडील राज्यात अजूनही उष्णतेची तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात तापमान वाढ थांबण्याची चिन्हं नाहीत. मात्र दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्च्रात पावसाळी वातावरण आहे.

विदर्भात सर्वत्र कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे आहे. तर राज्यात अकोल्यात सर्वोच्च म्हणजे 43.9 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही पारा चाळीशी पार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *