महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सलमान मुल्ला । दि.२० एप्रिल । उस्मानाबाद । कळंब । याबाबत सविस्तर माहिती अशी गेल्या वर्षी कळंब शहरातील मोंढ्यातील जाधव यांच्या आडत दुकानावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस गोळ्या घालून हत्या करून सशस्त्र दरोडा टाकून आरोपी फरार झाले होते..त्यामुळे कळंब शहर व तालुक्यातील सर्वांचेच लक्ष पोलिसांच्या कामगिरीकडे लागले होते..पोलिसही त्यांच्या मागावरच होते..पण काही सुगावा लागत नव्हता.पण पोलिसांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.. आणि आज याच गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात कळंब पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलीस ठाणे कळंब येथे दाखल गु.रं.न. १९५/२०२१ कलम ३९६ भादवि अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील दोन दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, व पोलीस नाईक फरहान पठाण यांना सदर गुन्हयातील दोन फरार आरोपी कळंब शहरात आल्याची माहिती मिळाली होती.
त्यांनी सदर गुन्हयातील आरोपी यांच्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता आरोपी नामे शंकर मच्छींद्र काळे, रा. कल्पना नगर, कळंब हा होळकर चौक येथील एका हॉटेलात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील व पोलीस नाईक फरहान पठाण यांनी होळकर चौकातील इडलीच्या हॉटेलात आरोपीस पकडण्यासाठी दोन तासापासुन सापळा रचुन बसले होते. आरोपी हॉटेलात येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सदर गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीबाबत विचारपुस केली असता त्याने माहिती दिली कि, शाम उर्फ बजा रामा पवार, रा. कल्पना नगर, कळंब हा कळंब शहरातील बाजार मैदानात असल्याची माहीती दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि अतुल पाटील, पोना फरहान पठाण, पोना प्रशांत राउत व पोना शिवाजी राउत यांचे पथक तयार करून आरोपीने सांगीतल्याप्रमाणे बाजार मैदान, कळंब येथे चारीबाजुने सापळा रचुन आरोपी नामे शाम उर्फ बजा रामा पवार यास ताब्यात घेतले.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव हे करीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, श्रीमती निवा जैन मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद श्री नवनीत कॉवत, मा. सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग कळंब, श्री एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कळंब येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पोलीस नाईक फरहान पठाण व स्टाफ यांनी पार पाडली.