![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२२ एप्रिल । मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कामगारांना कामावर हजर होण्याची दिलेली मुदत आज शुक्रवार, 22 एप्रिल रोजी संपत आहे. आज गुरुवारी 21 एप्रिल रोजी 2,992 नवीन कर्मचारी कामावर दाखल झाले असून आता हजेरीपटावरील 81,683 कर्मचाऱयांपैकी केवळ 4,721 कर्मचारीच उरले असून ते उद्या दाखल होतील असे म्हटले जात आहे.
संपामुळे गेले पाच महिने राज्याच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठप्प झाली होती. 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कामगारांना दिले आहेत. सध्या दररोज सरासरी सात हजार बसेसच्या आधारे 25 हजार फेऱया चालवीत त्याद्वारे 17 लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनापूर्व काळात एसटीमधून दररोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात होती, तर दिवसाला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते.