महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ एप्रिल । मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. (heat wave in maharashtra) उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कधी कडाक्याचं उन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचदरम्यान आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा –
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये- महाराष्ट्रापासून ओडिशा आणि बंगालपर्यंत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. उष्णतेची लाट म्हणजे जेव्हा कोणत्याही ठिकाणचे तापमान मैदानी भागात 40 अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात 37 अंश आणि टेकड्यांमध्ये 30 अंशांच्या पुढे जाते, अशी व्याख्या भारतीय हवामान खात्याने केली आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमाल तापमान 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअस असते जे त्या दिवसाच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतची लाट घोषित केली जाते.
राज्यात आज ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सद्या कमाल वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 43.2 अंश सेल्सियस तापमान येथे नोंदवण्यात आले आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात 42 अंशापेक्षा कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. कोकणात कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस, मराठवाड्यात 37 ते 42 अंश सेल्सियस, मध्य महाराष्ट्रात 25 ते 44, तर विदर्भात 39 ते 42 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे.