केंद्राने आधी आमचे पैसे द्यावेत; आम्ही पाच वर्षे पेट्रोल–डिझेल टॅक्स फ्री करू ; ममता बॅनर्जी

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.२९ एप्रिल । मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर बिगर भाजपप्रणीत राज्यांनी करसवलत देऊन सामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी चांगलेच सुनावले आहे. केंद्राने आधी पश्चिम बंगाल राज्याचे हक्काचे 97 हजार कोटी द्यावेत. ते मिळाले तर आम्ही राज्यात पुढील पाच वर्षे पेट्रोल-डिझेल पूर्णपणे टॅक्स फ्री करू, असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या विधानानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. मात्र कोरोनाच्या चर्चेवेळी मोदींनी महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल यासारख्या बिगर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्याचा, सबसिडी देण्याचा सल्ला दिला. मात्र कोरोनाच्या बैठकीत असा सल्ला देऊन मोदी यांनी बिगर भाजपप्रणीत राज्यांबद्दलचा आपला छुपा अजेंडाच दाखवून दिला आहे, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *