महाराष्ट्र 24 – पिंपरी – मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे दर रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची (अखंडित) पुजा गेली सात वर्षां पासुन श्री दिपक भोजने यांच्या पुढाकारने व समाज बांधवाच्या सहकार्यने पुजा केली जाते आजची पुजा श्री विभिषण घोडके कामगार नेते खजिनदार महेद्र लाॅजिस्टिक चाकण कामगार मंडळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कालच घोडके यांचा वाढदिवस होतो आज त्यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला राहुल मदने यांच्या हस्ते विभिषण घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय महानवर , महावीर काळे , धनंजय गाडे , तानाजी पांढरे , निलेश वाघमोडे , सचिन महानवर , विठ्ठल देवकाते , विनोद बरकडे , अक्षय वायकुळे , शंकर दातीर , बंडू लोखंडे , औदुंबर वायकुळे , सुरेश देवकाते व इतर समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री दिपक भोजने यांनी केले.