महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेसह गुन्हेगारांविरूद्ध कारवाईसाठी थेट मोक्का अस्त्र उगारून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्याचसोबत नागरिकांना भेडसाविणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ट्वीटरद्वारे सोशल व्यासपीठ उलब्ध करून दिले आहे. सोमवारी दुपारी एक ते दोन या वेळेत ते नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेउन सोडवणूक करणार आहेत.
पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. तक्रारींचे निवारण करण्यासाठी लाईव्हद्वारे नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
त्याशिवाय तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेउन संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सूचित केले जाणार आहे. ट्वीटरवरील लाईव्हमध्ये जास्तीत जास्त नागरिकांसह तरूण-तरूणींनी सहभागी होउन आपआपल्या अडचणी आणि तक्रारीं मांडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.