महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट पसरली असून आज सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा येथे 46.5 अंश सेल्सिअस करण्यात आली, तर चंद्रपूर 46.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे पूर्व विदर्भातील सहा जिह्यांत उष्माघाताचे 13 मृत्यू व 475 रुग्णांची नोंद झाली. यात चंद्रपूर जिह्यामध्ये सर्वाधिक 6 मृत्यू व 204 रुग्ण तर त्या खालोखाल नागपूर जिह्यामध्ये 5 मृत्यू व 143 रुग्ण आढळून आले आहेत.
विदर्भात उन्हाची भीषण लाट असून नागपूर, चंद्रपूरसह सर्वच जिह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप पाहायला मिळत आहे. एकीकडे तापमानाचा भडका उडत असताना दुसरीकडे रुग्ण व मृत्यूच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज वर्धा 46.5, चंद्रपूर 46.2, नागपूर 45.4, ब्रह्मपुरी 45.4, अकोला 44.4, यवतमाळ 45, अमरावती 44.8 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे.