वीरेंद्र सेहवागने दाखवली शोएब अख्तर ला त्याची जागा ; फेकी बॉलिंग करायचा

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू आणि ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक याचा वेग पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या होत्या. माझा विक्रम मोडताना स्वत:ची हाडे मोडून घेऊ नको असे कुचकट विधान शोएब अख्तर याने केले होते. आता त्याला टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने उत्तर दिले आहे. सेहवागने शोएब अख्तर फेकी बॉलिंग करायचा असे एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

शोएब अख्तरला माहिती होते की त्याचा कोपरा वाकतोय आणि आपण फेकी बॉलिंग करतोय. अन्यथा आयसीसीने त्याच्यावर बंदी का घातली असती? असा सवाल वीरेंद्र सेहवागने उपस्थित करत त्याच्या याच अॅक्शनमुळे त्याला खेळणे अवघड होते असेही तो म्हणाला. एक-दोन चेंडूवर त्याला चौकार-षटकार पडला की तो बीमर किंवा यॉर्कर टाकायचा, असेही वीरू म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *