केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिला काहीसा दिलासा मिळाला आहे. केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकी चितळे हिची पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या होत्या. केतकी चितळेचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *