राज ठाकरे यांची तोफ आता पुण्यात धडाडणार ; अखेर रविवारी सभा निश्चित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा अखेर निश्चित झाली आहे. रविवारी २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे सभा होणार आहे.

याअगोदर २१ मे रोजी नदीपात्र येथे राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तेथे सुरू असलेले मेट्रोचे काम, पावसाची शक्यता तसेच मैदान तयार करण्यासाठी असलेला अपुरा वेळ यामुळे हे ठिकाण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी केली.

ठाणे, औरंगाबाद येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंगे यावर भाष्य केले होते. शरद पवार यांच्याबरोबरच महाविकास आघाडीवर टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *