संदीप देशपांडे यांना अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर; ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ येथे दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे.

शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार दूर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *