OYO Rooms ची ग्राहकांना खास ऑफर ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स…

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मे । देशातील महत्वाची हॉस्पीटॅलिटी कंपनी ओयो रुम्सनं (OYO Rooms) आपल्या नियमीत ग्राहकांसाठी एक दमदार ऑफर आणली आहे. ओयो रुम्सच्या माध्यमातून एखादा ग्राहक सलग पाच दिवस ओयोशी संलग्न हॉटेलमध्ये राहिल्यास सहावा दिवस त्याला फुकटात राहता येईल, अशी ऑफर कंपनीनं सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्रहाकांना पाच दिवसांच्या स्टेवर एक दिवस मोफत दिला जाणार आहे. ओयो लॉयल्टी प्रोगाम अंतर्गत या ऑफरचा लाभ केवळ गोल्ड कस्टमर्सला घेता येणार आहे. कोरोना महामारीवर मात करुन नव्यानं उभारी घेणाऱ्या देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही ऑफर सुरू केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

ओयोनं दिलेल्या माहितीनुसार Wizard प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना ओयो Wizard बुकिंगवर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. देशात बजेट कॅटगरीमध्ये हॉटेलिंग सुविधा प्राप्त करुन देणारी OYO ही मोठी कंपनी आहे. OYO च्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये मोठा व्यवसाय आहे.

OYO Wizard मध्ये सध्या तीन क्लास उपलब्ध आहेत. यात Wizard ब्लू, सिल्वर आणि गोल्ड अशा पर्यायांचा समावेश आहे. ओयोच्या पाच दिवसांच्या स्टेवर एक दिवस स्टे फ्री ही ऑफर केवळ गोल्ड मेंबर्सना मिळणार आहे. तर सिल्वर मेंबरसाठी सातवा आणि ब्लू मेंबर्ससाठी आठवा दिवस फ्री मिळणार आहे. याशिवाय ओयो कंपनीनं Wizard क्लब मेंबर्ससाठी १३ हून अधिक बहुचर्चित कंपन्यांसोबत डिस्काऊंट कूपर आणि व्हाऊचरसाठी करार केले आहेत. यात डोमिनोज, लेन्सकार्ट, रिबेल फूड्स, गाना यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांसोबत ओयोनं करार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *