Raj Thackeray Birthday: राज ठाकरे यांचा ५४ व वाढदिवस ; राज मध्यरात्रीनंतर गॅलरीत आले अन्

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. मात्र यंदा राज ठाकरे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना भेटणार नाहीत. राज यांनी १२ जून रोजीच यासंदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून दिली होती. राज ठाकरे यांनी प्रकृतीसंदर्भातील कारण देत काही दिवसांमध्ये माझी शस्त्रक्रीया असून आपल्याला कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नसल्याचं सांगत राज यांनी यंदा कोणालाही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला जमणार नाही असं सांगितलं. या निर्णयामुळे राज समर्थकांचा हिरमोड झाला असला तरी रात्री १२ नंतर राज यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या नवीन घराच्या गॅलरीमधून खाली रस्त्यावर जमलेल्या त्यांच्या समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्याचं पहायला मिळालं.

वाढदिवसानिमित्त आपण कोणाला भेटणार नसल्याचं राज ठाकरेंनी १२ जून रोजीच जाहीर केलं होतं. तरीही त्यांच्या अनेक समर्थकांनी मुंबईतील दादरमधील शिवाजीपार्कजवळ असणाऱ्या राज यांच्या ‘शीवतीर्थ’ या निवासस्थानकाखाली मोठी गर्दी केली होती. रात्री १२ नंतर राज ठाकरे हे घराच्या गॅलरीत आले आणि त्यांनी हात उंचावून घरासमोर जमलेल्या मनसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. फार कमी वेळासाठी राज गॅलरीमध्ये होते. मात्र राज यांनी शुभेच्छा स्वीकारल्याने समर्थक आनंदाने घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *