मान्सून पुढे सरकला ; राज्यासह देशात पुढचे पाच दिवस मुसळधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । मान्सून आता आणखी थोडा पुढे सरकल्याचं चित्र आहे. आता तो अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग आणि संपूर्ण कोकण परिसरात पोचला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि परिसरात आज मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Monsoon updates in maharashtra and india)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकाच्या काही भागातही मान्सून पुढे सरकला आहे. त्याच बरोबर तेलंगण, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागातही काल मान्सून दाखल झाला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र (Arabian Sea), गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तमिळनाडू तसंच विदर्भ आणि तेलंगणच्या काही भागात पोचणार आहे.

पुढच्या पाच दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, पाँडिचेरी भागात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *