![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून । मुंबई नाशिक महामार्गावर (mumbai nashik highway) शहापूर ब्रिज जवळ नाशिकहून (nashik) मुंबईच्या (mumbai) दिशेने जाणारा टॅंकरचा अपघात (accident) झाला आहे. हा टॅंकर रस्त्याच्या मधोमध असल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱी वाहतूक (traffic) बंद झाली आहे. (nashik mumbai highway latest marathi news)
हा अपघात टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. या अपघातामुळे टॅंकर रस्त्याच्या मधोमध आडवा झाला आहे. यामुळे नाशिकवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱी वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे.
दरम्यान पाेलीसांनी या भागातील वाहतूक ऐकेरी मार्गाने सुरू केली आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिस टॅंकर बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत. या टॅंकरमधील चालक व वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या अपघाताची चाैकशी महामार्ग पाेलीस करीत आहेत.