या दिवशी झी-5 वर प्रदर्शित होणार धर्मवीर

 126 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । जाज्ज्वल्य धर्माभिमान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा असलेल्या आनंद दिघेच्या आयुष्यावरील ‘ ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुण्यासह राज्यभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांची हाऊसफुल्ल दाद मिळाली.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वात माणसं जोडण्याची एक विलक्षण ताकद होती. त्यांच्या याच करिष्म्याची प्रचीती पुन्हा एकदा त्यांचा चरित्रपट असलेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातून चाहत्यांना पाहायला मिळाली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. झी-5 ने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क घेतले असून येत्या 17 जून रोजी हा चित्रपट झी-5 वर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *