राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शिवाजीनगर, पुणे शहर कार्याध्यक्षपदी सौ. अमृता स्वप्निल रानवडे यांची निवड

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी मंगेश खंडाळे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या शिवाजीनगर, पुणे शहर कार्याध्यक्षपदी सौ. अमृता स्वप्निल रानवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय मा. अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने पार पडली.

मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते सौ. अमृता रानवडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. सुनिलआण्णा टिंगरे तसेच शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा कु. लावण्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निवडीमुळे शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *