जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । आंबट गोड असा स्वाद असलेल्या आंबा, चिंच, बोरं, जांभूळ अशा रानमेव्याची नावे जरी ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. निरर्गांने या प्रत्येक फळांना चवीसह औषधी गुणधर्माने (Black Jamun Has Many medicinal Properties) समृद्ध केलं आहे. लांबट आणि गोल आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभूळ बाजारात दाखल होतात. सधा बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पण यावर्षी रसरसीत जांभूळाच्या किमतीत वाढ झाल्याची पहायला मिळत आहे.

पावसाळ्यात, काळसर जांभळ्या रंगाच्या जांभूळाचे घड झाडाला लागलेले पाहायला मिळतात. निसर्गानं निर्माण केलेले हे फळ शरीरात अमृतासमान कार्य करतं. वर्षांऋतूत जांभूळ महत्वाचं फळ मानले जातं. गोल, लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो. जांभळामधील काही गुणधर्मांमुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. त्याशिवाय डोळे देखील चांगले राहतात. जांभळामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय ऍन्टीऑक्सीडंन्ट असतं. जांभळात कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असतं.

जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ हे गुणकारी असते.जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो, जांभळाचे आरोग्यदायी उपयोग जांभळाचा मोठा फायदा हा मधुमेहाच्या आजारात होतो. जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रुपांतर ऊर्जेमध्ये होतं. जांभळाचा उपयोग मधुमेहातील प्राथमिक लक्षणांवर होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *