ओ.बी .सी. जातीचा इम्पेरिअल डेटा तयार करण्याची पद्धत बदलावी ; राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड ओबीसी सेल ची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । पिंपरी -चिंचवड । आयोगामार्फत ओ.बी .सी. (इतर मागास वर्ग ) जातीचा इम्पेरिअल डेटा करण्याचे काम सुरु आहे . तसेच हा डेटा आडनावावरून तयार करण्याचे काम चालू असून हि पद्धत चुकीची आहे यातून ओ.बी .सी. (इतर मागास वर्ग ) वर अन्याय होण्याची शक्यता आहे. आडनावावरून जात ठरविणे हे शक्य नाही. यातून पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान आहे. ओ.बी .सी. (इतर मागास वर्ग ) जातीचा इम्पेरिअल डेटा तयार करण्याची पद्धत सदोष आहे. म्हणून गावोगावी व शहरातून वस्तुनिष्ठ जातनिहाय जातीची माहिती घेऊनच ओ.बी .सी. इम्पेरिअल डेटा करण्याच्या पद्धतीमध्ये त्वरित आवश्यक ते बदल करण्यात यावे , या मागणीचे निवेदन अप्पर तहसीलदार आकुर्डी यांच्या कडे करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड ओबीसी सेल चे अध्यक्ष विजय लोखंडे , उपाध्यक्ष पांडुरंग महाजन , महिला अध्यक्ष सारिकाताई पवार , प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, निरीक्षक सचिन औटे , राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कविता आल्हाट , माजी नगरसेवक राजेंद्र राजपुरे , माजी महापौर अनिता फरांदे, माजी नगरसेवक संगीता ताम्हाणे , माजी नगरसेवक भारती फरांदे, कविता खराडे संतोष माळी , विशाल जाधव, सुरेश गायकवाड , चंद्रशेखर भुजबळ, राजेंद्र कर्पे , तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *