Ashadhi Wari : संत मुक्ताई पालखीचे बीड नगरीत टाळ-मृदुंगाच्या गजरेत पालखीचे स्वागत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे आज बीड नगरीत आगमन झालं. सर्वात लांबचा प्रवास करून येणारी ही पालखी आहे. तर या पालखीत मोठ्या संख्येने महिला वारकऱ्यांचा सहभाग असतो. बीडमधील (Beed) आजोबा गोविंदपंत यांच दर्शन घेऊन ही पालखी गोविंदपंत यांच्या पालखीसह पंढरपूरकडे प्रस्थान करते. दोन दिवसांचा मुक्काम केल्या नंतर ही पालखी पंढरपूरला (Pandharpur) प्रस्थान होणार आहे. दोन वर्ष कोविडमुळे ही पालखी बीडमध्ये आली नव्हती, यंदा मात्र निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात बीडकरांनी पालखीचे स्वागत केले आहे.

पालखीच्या स्वागतासाठी एक ढोल पथक पालखीच्या पुढे चालत होतं आणि ते आपल्याच रंगात ढोल ताशाच्या गजरात या पालखीचे स्वागत करत होतं. यादरम्यान एका ढोल वाजवणाऱ्या काकांनी आपल्या चिमुकल्या पुतन्याला चक्क ढोलवर बसवून ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. हे दृश्य इतकं मनमोहक होतं की चिमुकल्याला पाहता अनेक जणांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. हा चिमुकला मोठ्या उत्साहाने ढोल वाजण्याचा आणि टाळ-मृदुंगाचा आनंद घेत होता. दरम्यान ही पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्काम करून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *