Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. काल पुण्यातून सासवड येथे पोहोचलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये बंधू सोपानकाकांच्या भेटीसाठी दाखल झाली असून आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. संत तुकाराम महाराजांची देहू वरून निघालेली पालखी पुण्यात आल्यानंतर हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे पोहोचली. आज सकाळीच लोणी काळभोरमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा यवतमध्ये असणार आहे.

यावर्षी होणारे हे दोन्ही पालखी सोहळे संपूर्णपणे निर्बंध मुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसऱ्याप्रमाणे गावागावात आणि चौका चौकात या पालख्यांचं अतिशय उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत होताना पाहायला मिळतय. तर या वारीत चालवणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजारो हात राबत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *