महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । जनता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार, बंडखोरांवर शिवसैनिक विश्वास करणार नाहीत. ज्यांनी आमच्यासोबत बंडखोरी केली त्यांनी शिवसेनेच्या नावाचा वापर करू नये. त्यांनी स्वत: च्या बापाच्या नावावर मते मागावी. बाळासाहेबांच्या नावाने मते मागून शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसणे बंद करावे. हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे द्यावे, असे खुले आव्हान संजय राऊतांनी बंडखोरांना दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, जे होईल ते पाहून घेऊ, बंडखोरांना मुंबईत यावे लागेल. राज्यातील हजारो शिवसैनिक आक्रमक झाले असून, आमच्या एका इशाऱ्याची त्यांना प्रतीक्षा आहे. मात्र, आम्ही सध्या संयम ठेवले आहे. शिंदे गट जेव्हा येईल तेव्हा कळेल की, बंडखोरी नेमकी कुठे होणार आहे. बंडखोरात सुद्धा बंडखोरी होऊ शकते, असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.
पुढे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राष्ट्रवादीवरील आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार एकनिष्ठ आहे, जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आरोप करतायेत ते लोकं पागल आहेत. ते कोणत्या धुंधीत आहे मला माहिती नाही. त्यांच्या जेवणात अफू, चरस, गांजा मिळवण्यात येत आहे का? असा संशय वाटतो. अडीच वर्षांपासून सत्तेत होतात, आता अचानक त्यांना बुद्धी सुचली.
काल एकनाथ शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नामकरण केले होते. त्याचा देखील राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, स्वत:च्या बापाच्या नावाने पक्ष तयार करा. त्यानंतर मते मागा. आमच्या बापाचं (बाळासाहेब ठाकरे ) यांचे नाव कशाला वापरता. तुम्हाला (शिंदे गटाला) शंभर बाप आहेत. दिल्लीत आहे, नागपूर, मुंबईमध्ये आहे. आमचा बाप फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. त्याच्याप्रती आम्हाला आदर आहेत. शिंदेगटाला शंभर बाप असून, ते कधी गुवाहटीत जातात, कधी सुरतला जातात, कधी दिल्लीत जातात अशा प्रकारे बाप बदल्याची पद्धत शिवसेनेत चालत नाही, असे राऊत म्हणाले.
जे शिवसेनेतून गेले ही त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यामध्ये धमक असले तर तुम्ही आमदारकीचे राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा. तुम्ही 54 असले तरी राजीनामे द्या आणि आपआपल्या मतदारसंघात स्वत: च्या नावावर निवडून या, असे खुले आव्हान राऊतांनी बंडखोरांना दिले आहे.
आसाममध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, तेथे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना भाजपवर या बंडखोरांना मदत करत असून, आसामच्या जनतेला वाऱ्यावर सोडत आहे. महाविकास आघाडी सरकार आहे आणि पुढेही राहणार त्यामुळे त्यांची मुंबईत येण्याची हिम्मत होत नाही. तुमच्याकडे जर 54 जणांचा गट आहे, तर या मुंबईत पार्टी निर्माण करा आणि तुमचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत, अशी खोचक टीकाही राऊतांनी यावेळी केली.
गुवाहटीत काय आहे विधानभवासमोर असलेल्या चौपाटीत या येथेही आपण गुवाहटीप्रमाणे मजा करू. बंडखोरांसाठी अजूनही दरवाजे उघडेच आहेत. आज पाच आमदारांशी बोलणे झाले त्यांची वापस येण्याची इच्छा दर्शवली आहे आणि ते नक्की येतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.