महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ जून । संजय राऊत हे शेरो-शायरीच्या अंदाजात विरोधकांवर टीका करत असतात. आतही राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर त्यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो टाकत त्यांनी हे ट्विट केलं आहे. कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी मे, असं त्यांनी म्हटलं आहे.
नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला हा भन्नाट फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. कधीपर्यंत गुवाहाटीत लपून बसणार आहात, चौपाटीवर म्हणजे मुंबईला यावंच लागेल, असं म्हणच एकप्रकारे आमदारांना डिवचलं आहे. संजय राऊतांचे हे ट्विट सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कब तक छीपोगे गोहातीमे..
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यावर येत्या ४८ तासांच्या आत (सोमवारी, २७ जूनपर्यंत) आपले मत मांडावे, असे आदेश देणारी नोटीस उपाध्यक्षांनी शनिवारी या १६ आमदारांना पाठवली. या आमदारांनी त्यांचे मत मांडले नाही तर त्यांना अपात्र ठरवले जाईल, असा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.