सत्तासंघर्ष शिगेला; एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 48 तासात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट (Shiv Sena rebel group) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात. तसेच आज महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi government) पाठिंबा काढल्याचे पत्रही देऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात येऊ शकते. तसेच राज्यपाल बहुमत ठराव सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावू शकतात.

एकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढणार अशी शक्यता आहे. तसे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत आम्ही सरकारचा पाठिंबा काढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज राज्यपालांना एकनाथ शिंदे गट पत्र देण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या दिवसात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिंदेंनी पत्र दिल्यास लक्ष राजभवनावर केंद्रित होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *