महाराष्ट्र 24 ऑनलाईन- पिंपरी- दर रविवारची साप्ताहिक पुजा ठरल्या प्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिला भगिनीच्या हस्ते करण्याचे आज दि. २६\६\२२ रोजी सकाळी ११:०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडीत पिंपरी येथे श्रीमती संगिताताई बाळासाहेब काकडे. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या यावेळी श्री दिपक भोजने यांनी साप्ताहिक अखंडित पुजेची आज पर्यन्तची ही माहिती ते म्हणाले साप्ताहिक पुजा जुन २०१५ ला सुरू झाली सध्या पुजेला सात वर्ष पुर्ण होवुन आठव्या वर्षात पदार्पण करत आहे विशेष म्हणजे करोनाच्या काळात सुध्दा पुजा होत होती हे सर्व माझे सहकारी व समाज बांधवमुळे शक्य झाले साप्ताहिक वर्धापनदिन व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्याची माहीती काही दिवसातच कळविण्यात येईल दर रविवार आपण पुजेला येत असतांना सोबत दोन तीन समाज बांधव सोबत घेऊन यावे असे अहवान करण्यात आले यावेळी अश्विनी लोखंडे , सोनाली फसके घोडके काका , श्री.दिपक भोजने, विजय महानवर, विठ्ठल देवकाते , बंडू लोखंडे, अच्युत लेंगरे किसन फसके, तानाजी डहाळे , नितीन वाघमोडे , मंगेश काकडे आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.