महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा कारभार सांभाळणारे ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोठी घोषणा केली आहे. मी उद्या दुपारी चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात ED समोर हजर होणार असल्याचे त्यांनी म्हटले. मी ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका मांडेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी हे सगळे दबाव सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या याच दबावामुळे आमच्या पक्षातील काहीजण पळून गेले. पण मी उद्या दुपारपर्यंत ईडीसमोर चौकशीसाठी हजर होईन. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईन, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.