इंग्लंड गोलंदाजाने परत लाज घालवली ; कसोटीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताने सर्वबाद ४१६ धावा केल्या. भारताकडून ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शानदार शतकी खेळी केली. या दोघांच्या फलंदाजीची चर्चा असताना भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने एकच धमाका केला. भारताच्या डावाचा अखेरीस त्याने अशी काही फलंदाजी केली की सर्वांना २००७च्या टी-२० वर्ल्डकपमधील युवराज सिंगच्या फलंदाजीची आठवण आली.

२००७च्या वर्ल्डकपध्ये युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ षटकार मारले. यामुळे ब्रॉडच्या करिअरवर मोठा डाग लागला. आता असाच काहीसा प्रकार बुमराहने केला. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये ३५ धावा दिल्या आणि यासह त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वात महाग ओव्हर ठरली.

बर्मिंगहॅम मैदानावर ३७५ धावसंख्येवर भारताला जडेजाच्या रुपाने नववा धक्का बसला. तेव्हा कोणालाही वाटले नाही की टीम इंडिया ४०० धावा करेल. पण कर्णधार बुमराहच्या मनात काही वेगळेच सुरू होते. त्याने ८४व्या षटकात ब्रॉडची धुलाई केली आणि ३५ धावा वसुल केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात इतक्या धावा कोणीही दिल्या नाहीत. याआधीचा विक्रम २८ धावांचा होता. पाहा काय झाले त्या ओव्हरमध्ये…

पहिला चेंडू- शॉर्ट चेंडूवर बुमराहने फाइन लेगला चौकार मारला
दुसरा चेंडू- ब्रॉडने टाकलेल्या बाउंसर चेंडू विकेटकीपरला धरता आला नाही आणि अंपायरने चेंडू वाइड दिला व भारताला ५ धावा मिळाल्या. तिसरा चेंडू- बुमराहने विचित्रपद्धतीने खेळलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. त्यात अंपायरने नो बॉल दिल्याने भारताला ७ धावा मिळाल्या.
चौथा चेंडू- पुन्हा एकदा चौकार
पाचवा चेंडू- आणखी एक चौकार
सहावा चेंडू- बुमराहने आणखी एक षटकार मारला
सातवा चेंडू- अखेरच्या चेंडूवर बुमराहला दया आली असावी त्याने फक्त १ धावा घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *